Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याAditya Thackeray : इथे गद्दारीला स्थान नाही... आदित्य ठाकरेंचे ट्विट चर्चेत

Aditya Thackeray : इथे गद्दारीला स्थान नाही… आदित्य ठाकरेंचे ट्विट चर्चेत

मुंबई | Mumbai

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर होताच या निकालावरून भविष्यातील राजकीय समिकरणांबद्दल अंदाज वर्तवले जात आहेत. महाविकास आघाडीविरुद्ध (Mahavikas Aghadi) शिवसेना- भाजप युती (BJP) अशी थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली.

- Advertisement -

दरम्यान या निवडणूकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे.या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. याच निकालावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

या निवडणूकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) घवघवीत यश मिळाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आमच्याच सर्वाधिक जागा लागल्याचा दावा केला आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देत शिंदे -फडणवीस सरकारवर हल्ला केला आहे. याच निकालावरुन आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे फडणवीस सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.

Barsu Refinery : बारसू आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

काय म्हंटले आहे आदित्य ठाकरे

त्यांनी म्हटलं आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की इथे गद्दारीला स्थान नाही आणि हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे.असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या