Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का?.. जाणून घ्या, काय म्हणाले शरद...

अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का?.. जाणून घ्या, काय म्हणाले शरद पवार?

मुंबई | Mumbai

हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenburg Report) वरून गौतम अदाणी यांच्या विरोधात कॉंग्रेस सह देशातील विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत. अदानी प्रकरणावरून कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेला आता एनसीपीकडूनच छेद देण्यात आला आहे.

- Advertisement -

शरद पवारांनी जेपीसीच्या मागणीवर आपली भूमिका मांडताना राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांनी मिळून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बनते त्यामुळे सहाजिकच सत्ताधारी पक्षाचे अधिक जण या समितीमध्ये असतील त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये त्यामधून किती सत्य बाहेर येईल? यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

आमिषाला बळी पडले अन् सात लाखांना फसले

१९ विरोधी पक्षाचे बहुमत असेल पण ते पक्ष जेपीसी मध्ये नसतील. जेपीसी मध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल त्यामुळे सुप्रीम कोर्ट चौकशी महत्वाची आहे. असे शरद पवारांचे मत आहे.

नशिबाने मारले अन् देवाने तारले… ऊस तोडणी मजूर महिलेची बसस्थानकातच प्रसूती

दरम्यान हिंडेनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. त्यांच्याबाबत पूर्वी ऐकलेलं नाही. त्यांच्या अहवालापेक्षा आपल्या देशातील संस्था काय बोलते याकडे अधिक लक्ष दिले जाईल असं पवार म्हणाले आहे. तर अदानींना टार्गेट केलं जात असल्याची भावना देखील यावेळी शरद पवारांनी बोलून दाखवली आहे.

धक्कादायक! नराधम सासऱ्याने केली सुनेची हत्या, चिमुकल्या नातीलाही संपवलं

- Advertisment -

ताज्या बातम्या