सोनू सूदची बहिण पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

सोनू सूदची बहिण पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

दिल्ली | Delhi

अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहिण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar) पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणूक (Punjab Assembly Election) रिंगणात उतरणार आहे. मोगा इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनू सूदने याबाबतची माहिती दिली.

मात्र मालविका कोणत्या पक्षातून, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. मालविकाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सट्टेबाजीला सुरुवात झाली आहे.

राजकारणात येण्याबाबत सोनुने सांगितले की, बहिणीची निवडणूक लढवणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. यावेळी सूद यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे कौतुक केले. लवकरच अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मालविका आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा एकत्र एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मालविकासोबत सोनू सूदही उपस्थित होता.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘पंजाब लोक काँग्रेस’या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे आता मालविका ही त्यांच्या पक्षातून निवडणूक लढणार का? यासारख्या चर्चा उपस्थित होत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com