अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी; काय आहे प्रकरण?

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी; काय आहे प्रकरण?

कोलकाता l Kolkata

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना आज त्यांच्या वाढदिवसादिवशी पोलीस चौकशीला सामोर जावं लागले आहे. सकाळी 10 च्या सुमारास ही चौकशी झाली.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांप्रकरणी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांनी चौकशी केली. मिथुन चक्रवर्ती निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलेले भाषण हे प्रक्षोभक असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारी FIR दाखल करण्यात आली होती आणि ती रद्द करण्यासाठी मिथुन यांनी कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने मिथुन यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर व्हावे असे निर्देश दिले होते.

मिथून चक्रवर्ती यांनी कोलकाता येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दात टीकास्त्र सोडले होते. ब्रिगेड ग्राऊंट येथील एका रॅलीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, 'मी एक नंबरचा कोबरा आहे. जर तुम्हाला डसलो तर तुम्ही फोटो बनाल'. या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी यांची वाट पाहणाऱ्या उपस्थितांसमोर केलेल्या भाषणात मिथून यांनी अनेक जोषपूर्ण पंचलाईन वापरत डायलॉगबाजी केली होती. त्यांनी म्हटले होते की, 'मला बंगाली असण्याचा गर्व आहे. मला माहिती आहे की तुम्हाला माझे डायलॉग आवडतात.' या वेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगचाही वापर केला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com