Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापंकजा मुंडेंना धक्का; साखर कारखान्यावर कारवाई

पंकजा मुंडेंना धक्का; साखर कारखान्यावर कारवाई

मुंबई |Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकानंतर एक सूचक घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना घडली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला आहे.

- Advertisement -

उत्तरप्रदेश एसटीएफची मोठी कारवाई; गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर

आज सकाळी १० वाजेपासून जीएसटीचे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले होते.  विशेष म्हणजे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बंधू-भगिनी एकाच कार्यक्रमात उपस्थित असताना तिकडे परळीत सकाळी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु केली.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मानूर गावी आज नारळी सप्ताहानिमित्त पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मात्र तिकडे परळीत धाड पडल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिंदे गटाच्या आमदाराचे प्रत्युत्तर; म्हणाले…

यावर पंकजा मुंडेनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, यावर मला ही आश्चर्य वाटत आहे. या कारखान्याच्या जीएसटीबद्दलचा आमचा अंतर्गत वाद सुरु आहे. तो माध्यमांपर्यंत जाण्याचं काही कारण नव्हतं. मात्र आज अचानक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.

मीदेखील अधिकाऱ्यांशी बोलले. पण अर्जंट कारवाई करण्याचे वरून आदेश होते, असं मला कळालं. तसेच त्यांच्याच वरील कार्यालयाकडून ही बातमी माध्यमांपर्यंत आधी पोहोचल्याचंही मला कळलं… हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

दरम्यान पंकजा म्हणाल्या की, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या 6-7 वर्षांपासून नुकसानीत आहे. कसातरी आम्ही तो चालवत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी याच कारणाने भेट घेतली होती. यावेळी 4-5 काऱखान्यांचा प्रश्न मांडला होता. आम्हाला जीएसटी भरायचाय, लोन पेंडिंग आहे, असे प्रश्न होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या