पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

अन्यथा कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल
पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य पोलीस दलात state police force बदल्यांचे मोठे रॅकेट racket of Transfer सुरु आहे. बदल्यांसाठी पोलीस अधिकारी दोन चार कोटी रुपये मोजून खाली वसुली करीत आहेत, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadnavis यांनी सोमवारी विधासभेत केला. पोलीस बदल्यांचे हे रॅकेट राज्यभर सुरू असून ते संपविले नाहीतर राज्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विरोधी पक्षाच्यावतींने आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना फडणवीस यांनी गृह खात्याच्या कारभारावर जोरदार टीका Strong criticism of the Home Department केली. विविध खात्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू असून सरकारी पैशाची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. २१ व्या शतकात जमीनी आणि कमीने यांचे भाव वाढतील हे भाकित महाविकास आघाडी सरकारचा कारभाराने खरे ठरत आहे, असा सणसणीत टोलाही फडणवीस यांनी लागवला

आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. पोलिसांचा असा व्यापार होत असेल तर राज्यात केवळ वसुलीचाच उद्योग सुरू राहिल. पैसे देऊन आलेले अधिकारी हे खाली केवळ वसुली करण्यावर भर देत आहेत. हे बदल्यांचे रॅकेट संपवले नाही तर कायदा व सुव्यवस्था कोलमडून पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

करोना काळात किड्या मुंग्यासारखी माणसं मेली असतानाही राज्य सरकारने हे बळी लपविल्याचा आरोप करताना फडणवीस यांनी केला. एप्रिल २०२० मधे राज्यात एकूण ४० हजार ६७१ मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर एप्रिल २०२१ मध्ये तब्बल ८४ हजार २६२ मृत्यूची नोंद झाली. मात्र सरकारने केवळ १४ हजार २६८ मृत्यूची नोंद दाखविली. मे २०२० मधे ५२ हजार ५९६ मृत्यू होते. तर मे २०२१ मध्ये ते १ लाख २२ हजार ८४ इतके नोंदवले. पण सरकारने केवळ २६ हजार मृत्यू दाखवले,असा आरोप त्यांनी केला.

बिहार, राजस्थानने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना लाखात मदत दिली. पण महाराष्ट्राने ५० हजार देण्याचे जाहीर करूनही एकाही कुटूंबाला एक रूपयांची मदत केली नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.

दरम्यान फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह काही मंत्र्यांवर आरोप करीत चौकशीची मागणी केली. जयंत पाटील यांच्याशी संबधित कासेगांव एज्युकेशन सोसायटीने खरेदी केलेल्या आणि परत सरकारकडून भूसंपादनात कोट्यवधीचा मोबदला मिळविला, असा आरोप करत फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीकेली. त्यासोबतच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबधित एका शिक्षण संस्थेला एकाच वेळी विद्यापीठाचा विरोध असतानाही सहा महाविद्यालयांना मान्यता कशी दिली ? असा सवाल त्यांनी केला.

या प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. कामगार विभागाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मदत देण्यात आली. ती रक्कम खात्यात जमा करण्यासाठी १३ कोटी रुपये देण्यात आले. कामगार खात्याअंतर्गत येणाऱ्या घरेलू कामगारांच्या मंडळामार्फत घरेलू कामगारांना मदत देतांना एक रुपयाही लागला नाही. मग बांधकाम कामगार मंडळाने दिलेले हे १३ कोटी कोणी लुटले, याची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

शिवभोजन थाळीमधेही Shivbhojan Thali बोगस लाभार्थी दाखवून कोट्यावधीची लुट सुरू आहे. तसेच तब्बल ६ लाख १६ हजार आदिवासी बालकांचे कुपोषण आहेत, असा दावा करताना फडणवीस यांनी कुपोषणात महाराष्ट्र नंबर वन ठरल्याची खंत व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com