Friday, April 26, 2024
Homeराजकीयदोन महिने नव्हे तर दोनशे महिने शिवसेनेची सत्ता जाणार नाही

दोन महिने नव्हे तर दोनशे महिने शिवसेनेची सत्ता जाणार नाही

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

गरीबातील गरीब, शेतकरी, शेतमजुर, कामगार, कष्टकरी, दिनदुबळे यांना न्याय मिळत असेल तर ते फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात मिळत आहे.

- Advertisement -

सामान्य जनतेचा विश्वासावर हे सरकार उभे आहे. त्यामुळे दोन महिने नव्हे तर दोनशे महिने शिवसेनेची सत्ता जाणार नाही, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी येथे केले.

येथील सुवर्णकार मंगल कार्यालय, रोटरी आय हॉस्पीटल मागे, स्टेशन परिसर, दोंडाईचा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा झाला.

तत्पुर्वी पालक मंत्री सत्तार व संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते नंदुरबार चौफुली, बस स्टॅण्ड दोंडाईचा व धुळे चौफुली जवळ येथे शिवसेना फलकाचे अनावरण करण्यात आले.

मेळाव्यास सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, शिंदखेडा विधानसभा संपर्कप्रमुख अनिल डेरे, नंदुरबार सहसंपर्क प्रमुख संजय उकिरडे, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटु पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत राजपुत, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीष देसले, शिरपूर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, विभाभाई जोगराणा, भाईदास पाटील, शानाभाऊ धनगर, मनोज पाटील, चेतन राजपुत, शैलेश सोनार, मनोज धनगर, महिला संपर्कप्रमुख प्रियंका घाणेकर, ज्योती पाटील, विद्या ठाकूर, सुनंदा पवार, सरिता महाजन, मिना चैनानी, विश्वनाथ पाटील, डॉ.भरत राजपुत, गणेश परदेशी, मयुर कदमबांडे, प्रदीप पवार, मनोज पवार, विजय सिसोदे, हिरालाल बोरसे आदी उपस्थित होते.

भाजपवर हल्ला करतांना ना.सत्तार म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यात शिवसेनेचा, शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे.

भाजपाने वचनाची पूर्ती केली असती तर युती तुटली नसती. 30 वर्ष शिवसेनेने साथ दिली. परंतु सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप महाराष्ट्रात वाढली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जे लोकोपयोगी निर्णय घेतात ते सर्वसामान्यांच्या हिताचे असतात. असे भाजपाचे लोक सुध्दा खाजगीत मान्य करतात.

ग्रामपंचात निवडणुकीचा बिगुल वाजला असून धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये जवळजवळ शंभर ग्रामपंचायतीत निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसैनिकांनी निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतीला पायाभूत, मुलभूत सुविधा मिळण्यासाठी निधी मंजुर करणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे, असे आवाहनही ना.सत्तार यांनी केले.

मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. पक्षात तरुणांना स्थान देण्याची जबाबदारी पदाधिकार्‍यांची आहे. मला फोटोछाप नको तर गरीबांसाठी काम करणारा शिवसैनिक हवा आहे, असे परखड मत संपर्कप्रमुख थोरात यांनी व्यक्त केले.

शिंदखेडा तालुक्यात 65 ग्रामपंचायती व शिरपूर तालुक्यात 34 ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी सांगितले.

धुळ्यातील मेळाव्यात पालकमंत्र्यांचे दणदणीत भाषण

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दणदणीत भाषण ठोकले. मंचावर संपर्कप्रमुख बबनराव थोरात,आ.मंजुळा गावित, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, डॉ.सुशिल महाजन, महेश मिस्तरी, गुलाब माळी, अरुण लष्कर, मनोज मोरे, राजेंद्र पाटील, किरण जोंधळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या