Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, छोटा पप्पू...

अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, छोटा पप्पू…

हिंगोली | Hingoli

राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांनी आदित्य यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे…

- Advertisement -

छोटा पप्पू काही बोलू शकतो याच्याबद्दल मला आश्चर्य वाटते. ते जेव्हा गोधडीमध्ये होते तेव्हा मी शेतकऱ्यांचे नेतृत्व करत होतो, असे सत्तार आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

ते म्हणाले, की आता हे गोधडीमधून निघालेले लोक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सरकार चांगले आणि गतिमान चालत आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय, अशी घणाघाती टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. अब्दुल सत्तार हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

ते पुढे म्हणाले की, टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प कधी बाहेर गेला आणि कसा गेला? तेव्हा नेमकी काय तारीख होती? हे बारकाईने पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. 21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते आणि जे बोलत आहेत ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते, असे प्रत्युत्तर सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना दिले.

उठा तयारीला लागा! राज्यात १४ हजार पदांसाठी होणार पोलीस भरती

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला होता. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; दोन बसेसची धडक

- Advertisment -

ताज्या बातम्या