सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो; सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर सत्तारांचा माफीनामा

सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो; सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर सत्तारांचा माफीनामा

मुंबई | Mumbai

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे वाढता विरोध पाहून अखेर सत्तारांनी आपले शब्द मागे घेतो असे म्हटले आहे.

सत्तार म्हणाले की, मी कोणत्याच महिलेविरोधात अपशब्द बोललो नाही. आणि मी जे बोलले ते आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल बोललो. सुप्रिया सुळे.. किंवा कोणत्याही महिलेचं मनं दुखवेल असा कोणताही शब्द मी बोललो नाही, जर कोणत्या महिलांना वाटत असेल मी आक्षेपार्ह बोललो, आणि त्यांची मनं दुखावली तर मी जरूर खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही, जे खोक्यांचा आरोप करत आहेत त्यांनी मी बोललो, मात्र माझ्या बोलण्याचा अर्थ महिलांबाबत काढत आहेत. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com