Sunday, April 28, 2024
Homeराजकीय'आप' २०२२च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढविणार; केजरीवालांची मोठी घोषणा

‘आप’ २०२२च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढविणार; केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली l Delhi

आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशातील सन २०२२ साली होणारी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) जाहीर केलं की, आम आदमी पक्ष २०२२ साली उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यूपीमध्ये पुढील निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. हे लक्षात घेऊन आता ‘आप’ने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

“उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाचं सरकार आलं. परंतु त्यांनी आपली घरं भरण्याशिवाय उत्तर प्रदेशसाठी काहीही केलं नाही. आज छोट्या छोट्या सुविघांसाठी उत्तर प्रदेशच्या नागरिकांना दिल्लीत का यावं लागतं?,” असा प्रश्न केजरीवाल यांनी केला. “उत्तर प्रदेशामधील सर्वच पक्षांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना धोका दिला आहे. प्रत्येक सरकारनं भ्रष्टाचारात एकदुसऱ्यांवर मात केली आहे. दिल्लीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांनी आम्हाला सांगितलं की दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशलादेखील प्रत्येक प्रकारचा लाभ मिळाला पाहिजे आणि लोकांचं कल्याणही झालं पाहिजे,” असंही ते म्हणाले. आज उत्तर प्रदेशात योग्य ध्येय असलेल्या राजकारणाची कमतरता आहे. ते केवळ आम आदमी पार्टीच देऊ शकते. उत्तर प्रदेशच्या चुकीच्या राजकारणानं आणि भ्रष्ट नेत्यांनी उत्तर प्रदेशला विकासापासून दूर ठेवलं. ज्या सुविधा दिल्लीत लोकांना मिळत आहेत त्या आजही उत्तर प्रदेशातील लोकांना मिळत नाहीत. उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाचं सरकार आल्यात त्या ठिकाणीही दिल्लीप्रमाणेच विकासाचं मॉडेल लागू केलं जाणार असल्याचं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं.

आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह योगी सरकारला अडचणीत आणण्यासाठी बर्‍याच दिवसांपासून यूपीच्या दौर्‍यावर आहेत. २०२० च्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत ऐतिहासिक विजय नोंदविल्यानंतर आपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन आपने पक्षाचे बलवान नेते संजय सिंग यांना यूपी प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. प्रभारी झाल्यानंतर, सिंह म्हणाले होते, ‘अरविंद केजरीवाल यांचे मॉडेल यूपीमध्ये सादर करण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. राज्यातील ४०३ जागांवर पक्ष आपला जनाधार वाढवेल. यासह आपने राज्यात सदस्यता अभियानही सुरू केले आहे.’आप पक्षाचं सदस्यत्व घेण्यासाठी लोकांना पक्ष कार्यालयात जाऊन नावनोंदणी करता येणार आहे. आपण पार्टी वेबसाइट आणि मिस कॉलद्वारे देखील सदस्यता घेऊ शकता.

गेल्या फेब्रुवारीपर्यंत पक्षाने ६० जिल्ह्यात आपले युनिट तयार केले होते. मागील महिन्यात आपच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट आहे. ‘आप’ मध्ये यूपीचे बरेच नेते आहेत, जे आमदार आणि मंत्री आहेत. त्यापैकी मनीष सिसोदिया, गोपाल राय, सत्यंदर जैन, इम्रान हुसेन यांची नावे प्रमुख आहेत. असा विश्वास आहे की निवडणुकीत आप नेता या नेत्यांना निवडणूक प्रचारात पुढे आणेल आणि ‘दिल्ली मॉडेल’ च्या माध्यमातून लोकांना आकर्षित करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या