Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर; म्हणाले...

आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले.

- Advertisement -

यावेळी सभागृहात भाषण करताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत भाषणावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला म्हटलं की, ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमचं ऐकलं नाही, त्यामुळे तुम्ही हा मार्ग पत्करला. पण असं काही पाऊल उचलताना आमच्या कानात नक्की सांगा.’ याला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, ‘अडीच वर्षापूर्वी भाजपनं शिवसेनेनं सांगितलं असतं. तर आज ही वेळ आली नसती.’

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या