Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याविकासाच्या नावाखाली शिंदे सरकार...; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

विकासाच्या नावाखाली शिंदे सरकार…; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

शिंदे सरकार (Shinde Government) विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी आणि घोटाळे करत आहेत. राज्यात सगळीकडे हे सुरू आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत…

- Advertisement -

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मेट्रो कारशेट आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आले. मात्र ठाकरे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा घोटळा झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

लोकसंख्येबाबत भारताची गाडी सुसाट.. चीनलाही टाकणार मागे

जानेवारीत रस्त्याच्या घोटाळ्याचा मुद्दा मी मांडला होता. कुठलीही कमिटी, नगरसेवक, जनप्रतिनिधी नसताना ५ मोठे कंत्राट देण्यात आले होते. यात पैसेही वाढवून देण्यात आले. अजूनही कामे मुंबईत सुरू झालेली नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशकात मनसेला मोठा धक्का! दिलीप दातीर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

शिंदे सरकारकडून मुंबईत काँक्रीटच्या रस्त्यात घोटाळा झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने याबाबत तक्रार देखील केली आहे. गद्दार गँग सोडली तर कुणालाही विचारा कंत्राट काढलेत पण कामे मात्र सुरू झालेली नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या