Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“खोके सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर...”; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

“खोके सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर…”; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. यामध्ये काही महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अशाप्रकारे लाठीमार केल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजुने एकमेंकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

- Advertisement -

जालन्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शांततेत सर्व सुरु होतं, मग एवढा लाठीचार्ज करण्याची गरज होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच इतकी संवेदनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही असं होऊच शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाही असा आरोप करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें वर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे.

मी दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. इतकी संवदेनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही असं होऊ शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाही. त्यामुळे या खोके सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर सरकार राजीनामा देईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही जालना हिंसाचारावर रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची घोषणा करण्यात आली. जालन्यात मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर आतापर्यंत १९ एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. जालना, लातूर, संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यात एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. तोडफोडीमुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी जालना एसपी तुषार दोसी यांना रजेवर पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर त्यांना रजेवर पाठवण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या