Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याAaditya Thackeray : "यह डर अच्छा है" असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री...

Aaditya Thackeray : “यह डर अच्छा है” असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत. पण तिथे जाऊन ते नेमकं करणार काय आहेत? कोण भेटणार, कुठल्या कंपन्या भेटणार हे माहिती नाही. त्यामुळे हे दौरे म्हणजे सुट्ट्या समजायला लागले आहेत का? तसेच माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दोन दौरे रद्द केले, “यह डर अच्छा है” असे म्हणत माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

Asian Games 2023 : रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले जोडीचा चीनमध्ये जलवा; टेनिसमध्ये भारताला मिळाले ‘गोल्ड मेडल’

यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार (Government of Maharashtra) घटनाबाह्य आहे. ६ हजार कोटींचा रस्ते (Road) घोटाळा झाला आहे. याप्रकरणी मी लोकायुक्तांकडे जाणार आहे. स्ट्रीट फर्निचर घोटाळाही झाला आहे. त्याबाबतही लोकायुक्तांकडे जाणार आहोत. मुख्यमंत्री (CM) टेंडर शोधत असतात आणि सरकारमध्ये अनेकांना फॉरेन ट्रिप करायला आवडते. यांना वाटते की सुट्टी लागली आहे. मी प्रश्न विचारला होता की तुम्ही परदेशात जाऊन काय करणार? हा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३० मिनिटात दौरा रद्द केला. यावेळी “यह डर अच्छा है”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; ‘या’ विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

पुढे बोलतांना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) सुद्धा घाणाला (Ghana) जाणार आहेत. मात्र, इकडे आमदार अपात्रताप्रकरण रखडवून तुम्ही संसदीय लोकशाहीची हत्या करत आहात. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला. ४ महिने झाले, तेव्हापासून निकाल पुढे ढकलला जात आहे. मी अध्यक्षांना विनंती केली, तुम्ही जाऊ नका राज्याची बदनामी करू नका. त्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर

तसेच आदित्य ठाकरेंनी पुढे बोलतांना उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांच्या परदेश दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा परदेश दौरा नेमका कशासाठी आहे त्यांनी सांगावे. तुम्हाला कुठे जायचे आहे तिथे जा मात्र जनतेच्या पैशांचा अपव्यय करु नका. उदय सामंत यांचा तिसरा परदेश दौरा आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्सला जात आहात. कुणाला भेटणार? कोणत्या कंपन्या येणार? याबाबत काहीच भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सामंत यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन

- Advertisment -

ताज्या बातम्या