आ रहा हूं...! राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच Congress ने शेअर केला 'तो' फोटो

आ रहा हूं...! राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच Congress ने शेअर केला 'तो' फोटो

दिल्ली । Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. मोदी आडनावारुन गुजरात कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी होती. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली होती. आज सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना खासदारकी बहाल केली आहे. राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व मिळणार आहे. यामुळे काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेसने सलग दोन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. पहिल्या ट्विटमध्ये काँग्रेसने लिहिले की, ‘द्वेषाच्या विरोधात प्रेमाचा विजय आहे’. दुसर्‍या ट्विटमध्ये काँग्रेसने राहुल गांधींचा संसदेतील जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अदानी आणि मोदी यांचा फोटो दाखवलो होता. काँग्रेसने या फोटोसोबत लिहिले की, 'मी येत आहे, प्रश्न सुरुच राहणार.'

आ रहा हूं...! राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच Congress ने शेअर केला 'तो' फोटो
Alia Bhatt : बेफाम सौंदर्य! गुलाबी साडीत आलियाच्या घायाळ करणाऱ्या अदा

मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com