बावनकुळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

बावनकुळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar )यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर जादूटोणा केल्याची टीका करीत पवार यांना भोंदूबाबा संबोधिणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण ( जि. ठाणे ) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बावनकुळे यांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याचे (Maharashtra Anti-Witchcraft Act) उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase- NCP )यांनी ही तक्रार दाखल केली.

जादूटोणा विरोधी कायदा करुनही चंद्रशेखर बावनकुळे जादूटोणाचे समर्थन करत असतील तर पुरोगामी महाराष्ट्राच्यादृष्टीने ते दुर्दैवी आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात तक्रार केली असल्याची माहिती तपासे यांनी दिली.

तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने जादूटोणा विरोधी कायदा (२०१३) केला आहे. त्या कायद्याचे समर्थन भाजपचे नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र ज्या कायद्याला भाजपच्या नेत्यांनी समर्थन दिले त्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष जादूटोणाबाबत बोलून जादूटोणाचे समर्थन करत आहेत, असा आरोप तपासे यांनी लगावला.

बावनकुळे यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात ( Khadakpada Police Station )तक्रार दाखल केल्याने आता कायदा त्याचे काम करेल, असेही तपासे म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com