चाळीसगावातून मोठा गट राष्ट्रवादीत जाणार

राष्ट्रवादीला पुन्हा मिळणार उभारी, भाजपाचे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न
चाळीसगावातून मोठा गट राष्ट्रवादीत जाणार

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

माजी मंत्री तथा भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर लागला. त्यांनी फोन करून भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला.

यानंतर लगेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने ते आपल्या पक्षात येत असल्याची घोषणा केली. एकनाथ खडसे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत जाहीर केले.

एकनाथ खडसंनी पक्षाचा राजीनामा दिल्यानतंर अवघ्या काही वेळेत भाजपाचे पदाधिकारी कैलास सुर्यवंशी, सतीश दराडे यांनी भाजपाचा सदस्यत्वाचा राजीनमा दिली आहे, त्यांचे राजीनामाच्या पत्र देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले. तसेच काही पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. तर चाळीसगाव तालुक्यातील भाजपाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपाला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला तालुक्यात बळ मिळणार आहे.

चाळीसगाव तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. आजघडील तालुक्यातून खासदार,आमदारासह, ग्रामपंचात व इतर संस्थावर भाजपाची सत्ता आहे. तालुक्यात भाजपाचे पालेमुळे रुजविण्यासाठी नाथाभाऊनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते आहे. तालुक्यात नाथाभाऊवर प्रेम करणार मोठ गट गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाला आहे. आता नाथाभाऊनी भाजपा सोडल्यामुळे, त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण भाऊच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत जाणार आहे. भाऊनी राजीनामा दिल्यानतंर जिल्ह्यातून पहिला राजीनामा त्यांचे खंदे समर्थक तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथील रहिवाशी कैलास सुर्यवंशी यांनी दिला. त्यांच्या पोठापाठ सतीश दराडे यांनी भाजपा सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच येणार काही दिवसात भाजातून अनेक जण राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यत वर्तवण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील राजकिय समीकरणे बदलणार असून पुन्हा चाळीसगाव तालुका राष्ट्रवादीमय होण्याची शक्यता नाकारात येत नाही. नाथाभाऊच्या राष्ट्रवादी होणार्‍या प्रवेशमुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकार्‍यांमध्ये व कार्यकर्तामुळे उत्साहाचे वातावरण आहे. तर भाजपाचे पदाधिकारी मात्र डॅमेज कंटोलसाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा तालुक्यातून आहे.

नाथाभाऊ राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्यामुळे निश्‍चितच जिल्ह्यासह तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा उभारी मिळणार, यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रवादीला जिल्ह्यातून एक मोठे नेतृत्व लाभणार असल्यामुळे आम्हा कार्यकर्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राजीव देशमुख माजी.आमदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com