Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधान परिषदेत याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचे लायसन्सदेखील (Revolver) रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आहेत, त्यांच्या गटाकडे सध्या सत्ता आहे, सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना क्लिन चीट दिली गेल्याचा आरोप, विरोधकांकडून करण्यात येत होते. मात्र त्यांना शस्त्र कायद्यांतर्गत (Arms Act) नोटीस पाठवण्यात आली होती.

मल्हारखानच्या नागरिकांना मिळणार न्याय

त्यांनी स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला दिल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सदा सरवणकर यांच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

काय आहे हे प्रकरण ?

दादरच्या प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात काही महिन्यांपूर्वी एका मिरवणुकीत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने त्यावेळी झालेल्या वादात गोळीबार झाला होता. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पण आतापर्यंत पोलीस तपासातून एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, असे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या