Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमहापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे महापालिकेतील कर्मचार्‍यांना पुढील आठवड्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात ठोस सकारात्मक निर्णय घेणार आहे. अशी ग्वाही

- Advertisement -

ना. एकनाथ शिंदे यांनी दिली. अशी माहिती आ. फारुख शाह यांनी दिली आहे.

महापालिकेतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सातवे वेतन लागू होण्यासंदर्भात आ. फारूक शाह यांना निवेदन दिले होते.

आ. शाह यांनी वेळोवेळी महापालिका प्रशासन व राज्य शासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात आ. शाह यांनी प्रधान सचिव यांची भेट घेऊन महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा,अशी मागणी केली होती.

त्यांनी नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेवून अद्यापही धुळे महापालिकेतील कर्मचार्‍यांना लागू झालेला नाही. त्यामुळे सदर सातवा वेतन आयोग लागू करून त्याचा फरक कर्मचार्‍यांना लवकरात लवकर अदा करण्यात यावा असे सांगितले.

धुळे महापालिकेत 12 ते 14 वर्ष सेवेचा कार्यकाळ पुर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करण्यात आलेली आहे.

तरी सदर योजनेचा लाभ धुळे महापालिकेतील कर्मचार्‍यांना देण्यात यावा अशीही चर्चा यावेळी आ. शाह यांनी केली.

धुळे महापालिकेतील कर्मचार्‍यांना पुढील आठवड्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात ठोस सकारात्मक निर्णय घेणार आहे. अशी ग्वाही ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या