Friday, April 26, 2024
Homeराजकीयसमाजातील 52 जाती आरक्षणापासून वंचित

समाजातील 52 जाती आरक्षणापासून वंचित

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

पारंपरिक जयंती साजरी न करता अण्णाभाऊ साठे जयंतीचे स्वरुप बदले पाहिजे. गेल्या 25 वर्ष सभागृहात काम केले. मात्र, ज्या समाजाला शासनाच्या योजना समजल्या. त्याच समाजाच्या पाच पिढ्यांनी लाभ घेतला.

- Advertisement -

मात्र, 52 जाती अजूनही शासकीय योजानापासून वंचित आहे. त्यांचे प्रबोधन करण्यासाठी निर्धार यात्रा काढली असून अबकड प्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे.त्यासाठी उपेक्षित समाजातील मुलामुलींपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी जनजागृती करीत आहे, अशी माहिती बहुजन रयत परिषदचे संस्थापक अध्यक्ष तथा माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पद्मालय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बहुजन रयत परिषद जिल्हाध्यक्ष रघुनाथ गालफाडे, महिला प्रदेशअध्यक्षा अ‍ॅड. कोमल साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. ढोबळे पुढे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे स्वरुप बदलविण्यासाठी राज्यभर निर्धार यात्रा काढण्यात आली आहे. या निर्धार यात्रेच्या माध्यमातून मातंग समाजासह सर्व उपेक्षित समाजाला एकत्रित करुन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करीत आहे.

उपेक्षित समाजात शिक्षणाचा अभाव जाणवत असून समाजातील मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, आरक्षणाविषयी वाड्यावस्त्यांवर जाऊन जनजागृतीचे काम करण्यात येत आहे.

ही निर्धार यात्रा राज्यभर फिरणार असून 5 सप्टेंबर रोजी समारोप करण्यात येणार आहे. दर चार वर्षांनी ही निर्धार यात्रा काढण्यात येत असून आता समाजातील मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आरक्षणासाठी लढा दिला पाहिजे.

फौजदार होण्यापेक्षा फौजदाराचा बाप होण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. छत्रपती शाहू महराज, गोपीनाथ मुढे यांनी सांगितलेल्या वाटेने जाऊन समाजात जनजागृतीची गरज आहे.तसेच 59 जातीचा प्रवर्गापैकी 52 जाती लाभापासून दूर आहेत,त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही निर्धार यात्रा काढली आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या