हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका!

मतदानाच्या चार दिवस आधी २६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका!

दिल्ली | Delhi

देशभरात विधानसभा निवडणुकांची एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.

राज्यात मतदानासाठी (Himachal Pradesh Elections) अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसच्या एकूण २६ नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपाचे (BJP) कमळ हाती घेतलं आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. “भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात”, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी केलं आहे.

१२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर, १२ डिसेंबर रोजी निकाल आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com