बिहारमध्ये 2 उपमुख्यमंत्री

नितीशकुमार घेणार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
बिहारमध्ये 2 उपमुख्यमंत्री

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार सोमवारी सायंकाळी शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते सातव्यांदा शपथ घेणार आहेत.

दरम्यान, नितीश सरकारमध्ये भाजपाचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. भाजपाकडून तारकिशोर प्रसाद आणि रेणी देवी हे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहे. काही वेळापूर्वीच ते नितीशकुमार यांच्या भेटीसाठी पोहचले होते. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांसह एकूण 15 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. भाजपा आणि जदयूचे प्रत्येकी 5 तर मित्रपक्षांच्या 5 मंत्र्यांचा त्यात समावेश असेल, असे वृत्त होते.

आज सायंकाळी शपथग्रहण सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थित राहणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com