Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांच्या मित्रांकडून १०० कोटींचा कोविड घोटाळा; सोमय्यांचा बॉम्ब

संजय राऊतांच्या मित्रांकडून १०० कोटींचा कोविड घोटाळा; सोमय्यांचा बॉम्ब

मुंबई | Mumbai

संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांनी बनावट कंपनी निर्माण केली. मुंबईतील कोविड सेंटर्सचे (Covid Centers) कंत्राट मिळवले आणि १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा (Scam) केल्याचा गंभीर आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केलेला आहे…

- Advertisement -

महालक्ष्मी रेसकोर्स, मुलंड, दहिसर, वरळी येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीदेखील सोमय्या यांनी केली आहे.

ते म्हणाले की, संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने (Thackeray Government) दिले.

या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केले, २० कोटींचे दुसरे पेमेंट करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मी तक्रार केली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.

तसेच, आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरुद्ध शिवाजीनगर पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. खोटे कागदपत्र देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या