राजस्थानमधला तमाशा पंतप्रधानांनी थांबवावा
राजकीय

राजस्थानमधला तमाशा पंतप्रधानांनी थांबवावा

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाजपावर टीकास्त्र

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

जयपूर | Jaipur -

राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा Tamasha आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावा असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत Ashok Gehlot यांनी म्हटलं आहे. विधानसभेचे अधिवेशन घेण्याबाबत घोषणा झाल्यानंतर घोडेबाजाराला उत आला आहे. Rajasthan Crisis

सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीचा खेळ सुरु आहे. या सगळ्या मागे भाजपाच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनींच हा सगळा तमाशा आणि घोडेबाजार बंद करावा असं म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपाकडून सुरु असलेला हा घोडेबाजार अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेशात राबवलेला प्रयोगच इथे सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला.

Deshdoot
www.deshdoot.com