तर मी रोख पारितोषिक देईल- सुनील केदार

 तर मी रोख पारितोषिक देईल- सुनील केदार

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे असे असले तरी बर्ड फ्ल्यूमुळे आतापर्यंत एकही जीवितहानी झालेली नाही.

AD

असे असताना राज्यात बर्ड फ्ल्यूचा कहर अशा आशयाची माहिती जनसामान्यांमध्ये पसरवली जात आहे. बर्ड फ्ल्यूमुले कोणाचा मृत्यू झाला अशी एखादी घटना सांगावी त्यांना मी रोख पारितोषिक देईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बर्ड फ्ल्यूच्या वाढत्या प्रभावाबाबत केदार म्हणाले की, बर्ड फ्ल्यूचा जास्त फटका हा पोल्ट्री असणाऱ्यांना बसत असून राज्यात एक ही जीवितहानी झालेली नाही. राज्यात पशुसंवर्धन आयुक्तालयाची एक लॅब पुण्यात असून दुसरी मास्को युनिव्हर्सिटीची नागपूर मध्ये आहे. नमुने घेण्याची सुविधा असली तरी तपासण्यासाठी केंद्राची मंजुरी आवश्यक आहे.

या दोन्ही लॅब संदर्भात केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला असून तो अध्याप प्रलंबित आहे. केंद्राने त्यास मंजुरी दिल्यास भोपाळला न पाठवता आपल्या राज्यात ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. बर्ड फ्ल्यू बाबत जास्तच गाजावाजा झाला असल्याने पुढील आठवड्यात नागपूर येथे चिकन फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले असून पुण्यात ही अशा प्रकारचा महोत्सव भरवावा, असे आवाहन ही केदार यांनी यावेळी केले.

AD

नामांतरावरून अंतर्गत वाद नाही

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याबाबत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे, अशी बातमी फक्त मीडियातून येत नाही. मात्र, अशा प्रकारचा कोणताही अंतर्गत वाद नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावर नक्कीच मार्ग काढतील अशी खात्री असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com