Type to search

Featured maharashtra राजकीय

एकनाथ खडसेंना देण्यासारखे शिवसेनेकडे आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांनी फेटाळले वृत्त

Share

पुणे | प्रतिनिधी

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या वृत्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले आहे. शिवसेनेकडे एकनाथ खडसे यांना देण्यासारखं आहे तरी काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडय़ाला भेट देऊन अभिवादन केलं. त्यानंतर प्रसार माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. आम्ही त्यांची नाराजी दूर केली आहे, त्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या बातमीमध्ये काही तथ्य नाही आहे.

तसेच शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय? कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली आहे. त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले. तरी देखील सोलापूर, सांगलीत आम्ही आलो आहोत यावरूनच समजून घ्यावे, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेवर यावेळी टीका केली. सत्ताधारी सरकारनं नीतिमूल्यं सोडली आहेत.

त्यांना जनतेच्या समस्यांचं काहीही पडलेलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला. आता बस, यांना बकीच्यांशी काहीही घेणं देणं नाही. वडिलांच्या इच्छेसाठी मुख्यमंत्री झालात का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

शिवसेनेवर  निशाणा साधताणा ते म्हणाले,साखरेचा विषय आला की मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूलचा विषय आला की मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता. केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का,’अशी बोचरी टीकाही पाटील यांनी केली.

एकर आणि हेक्टर मधला फरक कळत नाही. पिक कर्ज काय ते कळत नाही ,साखर तेल काही कळत नाही. सातबारा कोरा करणार होते त्याच काय झालं, सातबारावर किती कॉलम असतात हे माहिती आहे काय ? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लागवताना गृहमंत्री पद घ्यायला घाबरत असाल तर ते खाते शिवसेनेला द्या, या शब्दात पाटील यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान केले.

पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जनतेची परवड सुरू आहे. सरकार स्थापनेपासून बेकायदा कामकाज सुरू आहे. अद्याप मंत्रिमंडळातील खाते वाटप झालेले नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. सातबारा वर किती कॉलम असतात याची माहिती तरी आहे ? दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ केले. पण सातबारावर असलेल्या अन्य बोजा चे काय ? याचा विचार न करता केवळ फसवणूक केलेली आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!