जखमींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाला अपघात; पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी

0
नाशिक | नाशिक मुंबई महामार्गावरील मुंबई नाका परिसरात उड्डाणपुलालगत  जखमींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाला अपघात झाला. अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

एका अपघातातील जखमींना घेऊन ही पोलीस व्हॅन हॉस्पीटलकडे जात होती. पंरतु, जखमींना हॉस्पीटलमध्ये पोहचवण्याआधीच मुंबई-नाशिक महामार्गावरील राणेनगर परिसरातील उड्डाण पुलावर या पोलीस वाहनाला अपघात झाला.

भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून अंबड पोलीस ठाण्याच्या वाहनाला पहाटे साडेपाच च्या सुमारास धडक दिली. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून इतर दोन कर्मचारीदेखील जखमी असल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळते आहे.

अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*