Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पोलीस स्टेशन सुशोभिकरण प्रकरणी पीआय गाडे दोषी

Share

पोलीस अधीक्षकांची महानिरिक्षकांकडे कारवाईची शिफारस

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – पारनेर व निघोज पोलीस ठाण्यांचे बेकायदेशीर निधी जमवून सुशोभीकरण केल्याच्या प्रकरणात पारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या राहुरी येथे कार्यरत असलेले हनुमंत गाडे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तसा अहवाल अहमदनगर पोलीस अधिक्षक ईशु सिंधु यांनी उच्च न्यायालयात सादर केला.

यापुर्वी बनावट हिशोब व चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला होता. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी पोलिस अधिक्षक ईशु सिंधु यांना स्वतः न्यायालयात हजर राहुन याबाबत खुलासा मागविला होता. परंतु त्यांच्या खुलाश्याने न्यायालयाचे समाधान न झाल्याने याबाबत नाराजी व्यक्त करून पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते. नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते, त्यावर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याबाबत फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याची तयारी दाखवली होती.

त्यानुसार 3 मे रोजी फेरचौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश होते; परंतु लोकसभा निवडणूक बंदोबस्तामुळे चौकशी कामी पुरेसा वेळ न मिळाला नाही, असे कारण त्यांनी दिले होते. त्यामुळे मुदतवाढ देत सुनावणी तेरा जुनपर्यंत पुढे ढकलली होती. 13 जून रोजी या फेरचौकशी अहवालावर सुनावणी झाली .

चौकशीत पारनेर, निघोज या पोलिस ठाण्यांच्या नुतणीकरण व सुशोभीकरणावेळी नागरीकांकडून व सामान्य जनतेकडून वस्तू किंवा देणग्या स्वीकारण्याची परवाणगी आवश्यक असताना घेतली नाही. स्वीकारलेल्या वस्तु व देणग्या यांचा स्वतंत्र हिशोब, रोजकिर्द, किंवा रेकॉर्ड ठेवले नाही. कोणत्याही प्रकारची वरिष्ट कार्यालयाकडून परवानगी घेतली नाही.

त्यामुळे त्यांनी केलेले काम बेकायदेशीर असुन त्यांच्या कामात कसूर झाल्याचे निष्पण झाल्याने त्यांच्यावर नागरी सेवा कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या शिफारसीचा अहवाल पोलिस अधिक्षक ईशु सिंधु यांनी नाशिक विषेश पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला आहे. न्यायमुर्ती टि. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती के.के.सोनावने यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

त्यामुळे आता हनुमंत गाडे यांच्यावर विषेश पोलीस महानिरीक्षक कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. याचिकाकर्ते यांच्या बाजुने अ‍ॅड प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड अजिक्य काळे यांनी तर सरकार पक्षाचे वतीने विषेश सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहीले.

सुशोभीकरण प्रकणात फेरचौकशीत पोलिस अधिक्षक अहमदनगर यांनी दोषींवर कारवाईची केलेली शिफारस व ठपका ठेवल्याने मुद्यांवर आम्ही समाधानी आहोत. आता विषेश पोलिस महानिरीक्षकांनी दोषींवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याची मागणी त्याप्रकरणी करणार आहोत.
-रामदास घावटे, बबन कवाद
(याचिकाकर्ते)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!