Thursday, May 2, 2024
Homeनगरजामखेड तालुक्यात विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

जामखेड l तालुका प्रतिनिधी l Jamkhed

जामखेड तालुक्यातील सोनेगाव, खर्डा, राजुरी व वाकी परिसरात अवैध दारू विक्री, जुगार व मटका चालत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत यांच्या ट्रायकिंग फोर्स युनिटला

- Advertisement -

मिळाल्यामुळे गुप्त माहिती नुसार त्या ठिकाणी छापे टाकून साडे अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैद्य धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील खर्डा, सोनेगाव, वाकी व राजुरी परिसरात छापे टाकून कल्याण हारजीत मटक्याचे साहित्य, देशी व विदेशी दारू बाॅक्स असे साडे अकरा हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे व पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. सागर जंगम, पोलिस कॉ. आदित्य बेलेकर, पोलिस कॉ. संतोष जरे, पोलिस कॉ. दादाराव मस्के, पोलिस कॉ. घोडके पोलिस कॉ. साबळे, पोलिस कॉ. केशव व्हरकटे यांनी कारवाई केली.

तालुक्यातील सोनेगाव बस स्थानक परिसरात झाडाच्या आडोशाला कल्याण हारजीत मटका चिट्टी वर खेळला जातो तेव्हा तेथे छापा टाकून मटका सुरू असल्याचा प्रकार पंचासमोर दिसला त्यानुसार सत्यवान गोकुळ शिंदे या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व १२०० रूपये रोख जप्त करण्यात आले.

सोनेगाव परिसरात आरिफ नासीर शेख यांच्या हाॅटेल सहारा मध्ये विनापरवाना अवैध बेकायदेशीर दारू विक्री होते ही फोनवरून माहिती मिळाली त्यानुसार छापा टाकून ३०९० रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली व आरिफ नासीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खर्डा येथिल हाॅटेल कृष्णा मध्ये विनापरवाना अवैध्यरित्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार छापा टाकून २८०० रूपये किमतीची दारू जप्त करून अर्जुन किसन भराटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळगव्हान फाटा वाकी गावात हाॅटेल कन्हैया मध्ये विनापरवाना बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली व छापा टाकून २२३६ रूपये किमतीची दारू जप्त करून आण्णासाहेब छगन वायसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजुरी गावात हाॅटेल देवांश मध्ये विनापरवाना बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहितीनुसार छापा टाकून २१४० रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली व अशोक नवनाथ काळदाते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून साडेअकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सागर जंगम, पोलिस कॉन्स्टेबल आदित्य बेलेकर, पोलिस कॉन्स्टेबल संतोष जरे, पोलिस कॉन्स्टेबल दादाराव मस्के, पोलिस कॉन्स्टेबल घोडके पोलिस कॉन्स्टेबल साबळे, पोलिस कॉन्स्टेबल केशव व्हरकटे यांनी कारवाई केली.यामुळे परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या