जामखेडमध्ये कुंटणखान्यावर छापा, दोन मुलींची सुटका

0
जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील हाडोळा येथील कुंंटनखाण्यावर टाकलेल्या छाप्यात दोन मुलींची सुटका केली असून कूंटनखाना मालकीणीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन मुलींना पोलिसांकडून अहमदनगर येथील स्नेहालय येथे ठेवण्यात आले आहे तर कुंटणखाना मालक पसार झाला आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक बनवून जामखेडमधील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, पोहेकाँ बापू गव्हाणे, पोना बढे, पोकाँ केकाण, महिला पोकाँ जगताप, यांच्या पथकाने रात्री 10.30 वा आरोपीच्या हाडोळा येथील घरी छापा टाकला असता दोन मुली व वेश्या व्यवसायास लागणारे साहित्य, रोख रक्कम सहाशे आढळून आले.
कुंटणखाना मालकीणीला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु मालक यूसुफ शहा पसार झाला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बापु गव्हाणे यांनी दिलेेल्या फिर्यादीवरून वरील दोन अरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*