Friday, April 26, 2024
Homeनाशिकआयटी कंपनीवर पोलिसांची कारवाई; खासगी कंपन्या, संस्थांकडून कर्मचार्‍यांना जबरदस्ती

आयटी कंपनीवर पोलिसांची कारवाई; खासगी कंपन्या, संस्थांकडून कर्मचार्‍यांना जबरदस्ती

नाशिक । प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलीसांनी जमावबंदीसह विविध आदेश जारी केले असतानाही अस्थापना चालू ठेवणार्‍या मुंबई नाका परिसरातील एका आयटी कंपनीवर पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली.

- Advertisement -

याहस इतर खासगी संस्था व अस्थापना कामगारांना जबरदस्तीने कामावरती बोलवत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.
मुंबईनाका येथील ही आयटी कंपनी असून शासनाने महत्वाचे काम असेल तर अशा कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्यास सांगीतले आहे.

मात्र अशा कंपन्यांसह काही खासगी महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खासगी अस्थापना, कंपन्या हे कार्यालयीन कर्मचारी तसेच कामगारांना जबरस्तीने कामावर बोलावत आहेत.

न आल्यास पगार दिला जाणार नसल्याच्या धमक्या दिल्या गेल्याने आज एसटी तसेच वाहतुकीची साधने बंद असतानाही कर्मचार्‍यांना घराबाहेर पडावे लागल्याचे चित्र होते. यामुळे मुंबई नाका येथे एका आयटी कंपनीने अशा कर्मचार्‍यांना बालावून काम सुरू ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईनाका पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली.

जनता कर्फ्यू यशस्वी झाला. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने जमावबंदीसह नवीन आदेश काढले आहेत. या आदेशाकडे  शहरासह इतर उपनगरांमध्ये सर्रास दुर्लक्ष झाले. सकाळी नेहमी प्रमाणे पोलिस बंदोबस्त रस्त्यावर तैनात होता. मात्र विविध कारणे पुढे करण्यात येत असल्याने पोलिसांची मात्रा चालेना. यमाळे  पोलिसांनी कडक भुमिका घेण्यास सुरूवात केली आहे.

करोना रोखण्यासाठी गर्दी टाळावी या मुलभूत नियमाकडे दुर्लक्ष करून किमान तीन प्रवाशी घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकांना अडविण्यात आले. थांबविण्यात आलेल्या ठिकाणीच प्रवाशांना खाली उतरवून रिक्षाचालकास घरचा रस्ता धरण्यास सांगण्यात आले.

कॅनडा कॉर्नर, रविवार कारंजा, मुंबईनाका, मालेगाव स्टॅण्ड अशाच शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी बॅरकेडींग करण्यात आले.

दरम्यान, नाकाबंदी करण्यात येऊन कारवाई करण्यात आली.  एकिकडे  शहरात नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने सहकार्य न केल्यास पोलिसांना आणखी कठोर पावले उचलावी लागतील, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले

- Advertisment -

ताज्या बातम्या