कोपरगावात गणेशविसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते व पोलिसांत राडा

0

पोलिसांचा लाठीमार : चार जखमी, 200 जणांवर गुन्हे दाखल

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – गणेश विसर्जन प्रसंगी प्रगत शिवाजीरोड संयुक्त गणेश मंडळ व राजमुद्रा प्रतिष्ठान दरम्यान गणपती मागेपुढे घेण्यावरून वादावादी झाल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर सहपोलीस ताफा भाजीमार्केट समोर नगरपालिकेच्या रोडवर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही मंडळांच्या सदस्यांना समजावून सांगितले परतु प्रगतच्या कांही कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली व एकाने पोलिसाची गच्ची पकडून हुज्जत घातल्याने शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात प्रगतचे पाच कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळ घडली आहे.

रविवारी सायकाळी 5 वाजेच्या सुमारांस पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सपोनि बोरसे, पोसई नागरे, सहा. फौ. मिसाळ पो. कॉ. गवसेणे, पाखरे, वाघ, गवारे, अग्रवाल तसेच दौंड येथील एक एसआरपी प्लाटून असे विघ्नेश्वर चौकात गणपती विसर्जन बंदोबस्त करीत होते. तेवढ्यात आंबेडकर पुतळ्यापासून बॅरिकेट तोडून प्रगत शिवाजीरोड संयुक्त गणेश मंडळ ढोल पथकासह विघ्नेश्वर चौकात आले. 150 ते 200 कार्यकर्त्यांनी येऊन येथूनच मिरवणूक काढू द्या म्हणून पोलीस यंत्रणेशी हुज्जत घालण्यास सुरुवत केली. सदर मंडळातील कार्यकर्ते पोलिसांनाच दमबाजी करीत होते. पोलिसांनी त्यांना समजावून सांगून नगरपालिका रोडने गणपती व ढोल पथक घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर ते तेथून निघून गेले. परंतु पुन्हा 5.45 सुमारांस नगरपालिका रोडवर प्रगत शिवाजीरोड संयुक्त गणेश मंडळ व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये गणपती मिरवणूक क्रमांकावरुन भांडणे सुरु झाली. प्रगत शिवाजी रोडचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

त्यावेळी सुमित बिडवे याने पो.कॉ.पाखरे याची पोलीस गणवेशात असतांना गचांडी धरुन छातीवर व तोंडावर बुक्की मारुन पोलीसांची काय लायकी आहे? व अन्य कार्यकर्त्यांनी पोलीसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे पो.ना.सुरेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादी नुसार विजय चव्हाण, अमृत काकड, वैभव आढाव, लक्ष्मण बागुल, विजेंद्र आदमाने, विशाल लकारे, नितीन आढाव, भुषण नरोडे, विक्रांत कुदळे, सागर नरोडे, रवि डमाळे, मानस लचके, साई नरोडे, योगेश शिदे, अमोल महाले, रोहित आढाव, योगेश शेलार, विकास आढाव, आबा नरोडे, सतिष भगत, महेश मते, मनोज आढाव, महेश आढाव, विशाल आढाव, सुमित बिडवे सर्व रा.कोपरगांव व इतर 150 ते 200 कार्यकर्त्यांवर भादवि कलम 353, 332, 323, 504, 506, 143, 146, 147, 149, व म.पो अधिनियम 1951 चे कलम 37,1,3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

प्रगत शिवाजीरोड संयुक्त गणेश मंडळाने पोलीसांनी आम्हाला सहकार्य करण्याऐवजी आमच्या कार्यकर्त्यांवर जाणून बुजून लाठीचार्ज केल्याचा आरोप वैभव आढाव यांनी केला असून पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये चार कार्यकर्ते जखमी झाले त्यात विजय चव्हाण यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून 10 ते 15 टाके पडले आहेत. अमृत काकड याच्या डोळ्याला जखम झाली असून वैभव आढाव व लक्ष्मण बागुल यांना पाठीला व कंबरेला दुखापत झाल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*