Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भागवत प्रकरणात पोलीस अधिकारी निलंबीत

Share

संशयाची सुई, प्रथमच अपेक्षीत तपास न झाल्याने कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

विष्णु भागवत यांच्या माऊली मल्टी स्टेट संस्था फसवणुक प्रकरणात पहिल्या तक्रारीवेळीच योग्य तपास व कारवाई न करता अप्रत्यक्षरित्या त्याला मदत केल्याच्या संशयावरुन तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेतील तर आता सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय पन्हाळे यांना निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

माऊली मल्टी स्टेट संस्थेच्या विष्णु भागवत व इतर संंशयितांनी संचालकांनी वेगवेगळ्या कंपनी सुरु करुन जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या कंपन्यांमध्ये केली. मात्र ठरल्याप्रमाणे संशयितांनी गुंतवणूकदारांना परतावा न दिल्याने फसवुक केली. त्यांच्याविरोधात दीड ते दोन वर्षांत मुंबईनाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. मात्र, या गुन्ह्यांत अपेक्षीत कारवाई न झाल्याने गुंतवणूकदारांनीही नाराजी दर्शवली होती.

दरम्यान, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त समिर शेख व त्यांच्या पथकाने भागवत सह अनेक एजंटांना पकडले आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मालमत्ताही जप्त केली. तसेच पैशांची गुंतवणूक करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुनील आडके यांनाही अटक केली. या दरम्यान पुर्वीच्या तापासातील तृटी समोर आल्या. त्या जाणीवपुर्वक ठेवल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. यामुळे याआधी या गुन्ह्याचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. यातून पन्हाळे यांच्यासह काही कर्मचार्‍यांची खात्यातंर्गत चौकशीही झाली.

त्यात त्यांनी समाधानकारक बाजू न मांडल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेतून काही महिन्यांपूर्वीच त्यांची सरकारवाडा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली होती. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या कारवाई बाबत गुप्तता पाळली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!