Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनांदूरशिंगोटे चेकपोस्टवर वाहनांची कसून चौकशी

नांदूरशिंगोटे चेकपोस्टवर वाहनांची कसून चौकशी

नांदूर शिंगोटे | Sinnar

राज्य शासनाच्या जिल्हा बंदी आदेशान्वये येथील नाशिक-पुणे महामार्गावर चेक पोस्ट उभारण्यात आला असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सचिन पाटील ,ग्रामीण पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हद्दीवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने जिल्हा बंदीचे आदेश जाहीर केले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे येथे चेकपोस्ट उभारण्यात आला असून येथे सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे ,ठाणे अंमलदार एन. एस. आडके ,केशव शेळके आदी कार्यरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या