Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस

Share

केंद्र व राज्याच्या 12 कंपन्या जिल्ह्यात तैनात

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा पोलीस दलाकडून बंदोबस्ताची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 12 मतदारसंघांत सात हजार पोलीस कर्मचार्‍यांच्या बंदोबस्ताचे नियोजन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. यात गुजरातमधून एक हजार आणि मध्यप्रदेश राज्यातून 600 गृहरक्षक दलाचे जवान यांचा समावेश आहे. यासह केंद्रीय सशस्त्र दल व राज्य राखीव दलाच्या 12 कंपन्या जिल्ह्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवारी) मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने 7 हजार पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मतदानापूर्वीच समाजकंटकांवर जिल्हा प्रशासनाने हद्दपारी, प्रतिबंधात्मक, तडीपारीच्या प्रक्रिया केलेली आहे. अनेकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले असून काहींचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. गस्त पथकांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

प्रत्येक मतदार संघासाठी जिल्हा पोलीस दलाबरोबर बाहेरून आलेल्या पोलीस उपअधीक्षकांवर बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अतिसंवेदनशील भागात पोलिसांनी संचलन करत शक्तिप्रदर्शन केले आहे. वाळूतस्करांसोबतच कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएअतंर्गत कारवाई करत सुमारे नऊ जणांना स्थानबद्ध करण्यात आहे. अटी-शर्तीवर आणि प्रतिज्ञापत्रांवर 361 जणांना जिल्ह्यात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिसांनी चांगलीच नजर ठेवली आहे.

नेवाशाचे दोन तर नगरमधून एक हद्दपार
निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी नेवासा तालुक्यातील सोनई व नगर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले घोडेगाव येथील सुनिल अंबादास तांबे, चांदा येथील आश्पाक उर्फ बाबा निसर शेख व एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील देहरे येथील गोरख करांडे या तिघांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यानुसार तांबे यास 6 महिन्यांसाठी तर शेख व करांडे या दोघांना प्रत्येकी 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील 361 जणांना अटी व शर्तींवर शहरात राहण्यास मुभा दिली आहे. नगर शहर व तालुक्यात राहण्यास मुभा दिलेल्या 361 जणांना मात्र दररोज सायंकाळी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

असा राहणार बंदोबस्त
पोलीस अधीक्षक- 1, अतिरिक्त पोलीस अधीक्षक-2, पोलीस उपअधीक्षक – 13, निरीक्षक – 173, पोलीस कर्मचारी – 3300, होमगार्ड – 2300, सीआरपीएफ कंपनी – 6, एसआरपीएफ कंपनी – 6.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!