Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

कोलकात्यातील बाजारमध्ये स्फोट, 1 ठार 9 जण गंभीर जखमी

Share

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरातील दमदम परिसरात आज सकाळी बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात ९ जण जखमी झाले आहेत तर सात वर्षाचा एक लहान मुलगा ठार झाला आहे. स्फोट झाला ती जागा कोलकाता विमानतळाहून हाकेच्या अंतरावर आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट डमडम पोलीस ठाण्याच्या हद्दीत, काझिपाडा भागातील एका बहुमजली इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला असलेल्या मिठाईच्या दुकानासमोर बॉम्बस्फोट झाला. जखमींना शासकीय आर. जी. कार मेडिकल महाविद्यालय तथा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर चार जखमी अजूनही अत्यवस्थ आहेत. हा स्फोट उच्च तीव्रतेचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी अजूनतरी स्विकारलेली नसून या स्फोटामागचे कारण ही स्पष्ट झालेले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!