Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : क्रिकेट खेळतांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने पोलिसाचा मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रिकेटचे सामने खेळात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप वसंत सानप असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते.

गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले.

त्यावेळी मैदानात खेळत असताना सपोनि सानप यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!