पोलिसांनी बालविवाह रोखलेली मुलगी गायब

0

आईची राहुरी पोलिसांत फिर्याद  ; आरोपींचा तपास सुरू

पाथर्डी (प्रतिनिधी) – पाच महिन्यांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले. दोन मुले राहुरी तालुक्यातील एका शाळेत शिक्षण घेत आहेत. मोठ्या दोन मुलींचे लग्न झालेले. घरी अठराविश्व दारीद्रय. जगण्याची लढाई लढताना सख्ख्या भावाने पैशासाठी अल्पवयीन भाचीवर डोळा ठेऊन तीन लाखांना विकले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. मामा मामीने संगनमताने अल्पवयीन भाची बहीणीच्या घरातुन पळवुन नेली. हदयपिळवटुन टाकणार्‍या घटनेने तालुक्यातील मढी गाव व परिसर हादरून गेले आहे.

याबाबत पाथर्डी पोलीस व संबधित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेली माहीती अशी मढी येथील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची आई गावात मोल मजुरी करून गुजराण करते. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे मामाची मुलगी हिचा अपघातात हात मोडला म्हणुन काही दिवस मढीची अल्पवयीन मुलगी तेथे मदतीसाठी गेली.

तिचा मामा, मामी व मामाचा जावई अमोल यांनी दोन-तिन लाख रुपये घेऊन 35 वर्षीय युवकाबरोबर 14 वर्षाच्या अल्पवयीन भाचीने लग्न ठरवले मुलीच्या बहीणी व आईला मुंलाना भेटण्यासाठी म्हणुन उंबरे येथे बोलावुन घेतले. सर्व कुटुंबीय रविवारी ( ता. 2) एकत्र आल्यावर संबंधित युवकाबरोबर लग्न आयोजित केल्याचे सांगण्यात आले चौकशी दरम्यान मुलगा जास्त वयात असल्याचे समजतास मुलीच्या बहीणी आईने लग्नास संमती दिली नाही.

मुलगी 14 वर्षाची अल्पवयीन असल्याचे कुणीतरी राहुरी पोलीसांना माहीती दिल्याने त्या दरम्यान पोलीस येत त्यांनी बालविवाह रोखला. पित्याच्या वयाच्या माणसाबरोबर विवाह आयोजीत केल्याबद्दल राहुरी पोलीसांनी मामा मामी कडक शब्दात समज देउन मुलीला मामा मामी बरोबर मढीला पाठवुन दिले. विवाह न होताच शिकार हातुन निसटल्याने मामा- मामी सुडाने व अपमानाने पेटून उठले.

संबधीत मुलीची आई उंबरे येथे थांबली. मढी येथे आल्यावर रात्री संबंधीत तरूणीला जावई व विवाह करणार्‍या तरुणाच्या मोटारसायकलवर कोठेतरी नेले भाऊ व भावजाईने तीला मोटार सायकलवर बसवुन दिले दुसर्‍या लहान्या मामाने संबधीत तरूणीच्या आईला फोनवरून कळविले. मामा, मामी, जावई व संबंधित तरुण यांचा शोध घेतल्यावर यांचा सुध्दा थांगपत्ता लागला नाही.

त्यांनतर अल्पवयीन तरूणीच्या आईने पोलीस स्टेशनला फिर्याद नोदंवली या प्रकाराने मुलीची आई बहीण व भावांचा अगदी धीर खचला असून आईच्या डोळ्यातील अश्रुच्या धारा गरीबीमुळे निर्माण झालेली असह्याता पाहुन प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे तिसगाववरुन येणार्‍या वाटेकडे डोळे लावून आई स्वतःशीच पुटपुटत असते. लग्नाच्या वेळी मामा पाठीमागे उभा राहीला शिवाय लग्न लागत नाही एवढा मामाचा सन्मान असतांना पैशाच्या अमिषासाठी भाचीच्या जिवाशी खेळणारा मामा कुटुंबासाठी कंसमामा (काळीमा) ठरत आहे .

मुलाकडील लोकांना आम्ही पैसे मागितले नाहीत आमच्या नावावर कुणी घेतले असतील तर ते मिळाले नाहीत व पैसे घेवून म्हातार्‍या बरोबर लग्न लावून देणारे आमच्या कुंटुबात संस्कार नाहीत. भावाने जर पैसे घेतले असतील तर त्याला भाऊ तरी कसे म्हणावे? मुलीच्या आईने भावनेला करून दिलेली वाट उपस्थितांसह पोलिसांनाही हेलावणारी ठरली. आरोपीचा लवकरच तपास लावु व मुलगी सुरक्षित सापडेल अशा शब्दात पोलीस अधिकार्‍यांनी दिलासा दिला. तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

*