Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पोलिसाला मारहाण : पाच आरोपींना अटक

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील खाकीबा देवस्थानजवळ बंदोबस्तासाठी असणार्‍या संजय कोतकर या पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील पिसोरे खांड, येथील आषाढ महिन्यात भरणार्‍या खाकीबाच्या जत्रा उत्सवात 18 रोजी पोलीस कॉन्स्टेबल संजय कोतकर यांना मद्यपी जमावाकडून जबर मारहाण झाल्याची घटना 3:45 वाजनेच्या दरम्यान घडली व याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पोलीस कर्मचार्‍यास मारहाण झाल्याची माहिती पो. नि. दौलतराव जाधव यांना समजताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाचे चक्र फिरवीत व्हिडिओमधील मारहाण करणार्‍या आरोपींचा शोध घेऊन या प्रकरणात प्रदीप निवृत्ती वाघमोडे (रा. रेहकुरी, ता. कर्जत), धनराज विठ्ठल शिंदे, हितेश युवराज साबळे, श्रीकांत लक्ष्मण डाळिंबे व किरण संतोष घालमे (रा. शिंदा ता. कर्जत) येथील हे सर्व आरोपी असून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!