Video : एमजीरोडच्या चारचाकी वाहनांवर पोलिसांची कारवाई; जॅमर लावले

0
नाशिक | वेळ दुपारी सव्वातीन वाजेची. अचानक नाशिक शहर पोलिस शहरातील एमजी रोड वर दाखल झाले.

एक-एक करत असंख्य वाहनांवर नाशिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. यावेळी नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांना दंड करण्यात आला, तर काहीजण वाहने पार्क करून बाहेर गेले होते. त्यांच्या वाहनांना जॅमर लावून कारवाई केली.

काही वाहनचालकांकडून जागेवरच दंड वसूल करून वाहन सोडून देण्यात आले. दरम्यान, परिसरात मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, नियमित कुठेही वाहने पार्क करणाऱ्या चालकांवर कारवाई केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

*