Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: गुंडासमवेत नाचणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला दणका

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – मोहरम विसर्जन मिरवणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर पैसे हातात घेऊन नाचणार्‍या कोतवाली पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचार्‍याला त्याचा नाच चांगलाच अंगलट आला आहे. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी त्याला पथकातून वगळले आहे. तसेच वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार आहे. वाघ यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

गेल्या आठवड्यात शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक झाली. यामध्ये शोध पथकातील पोलीस कर्मचारी शहरातील एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर नाचत होता. यावेळी त्या गुन्हेगारावरून पैसे ओवाळून आजूबाजूच्या लोकांमध्ये वाटत होता. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. याची चर्चा चांगलीच रंगली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!