दिन विशेष

आजचे दिनविशेष (दि २० जुलै २०२०)

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

आजचे दिनविशेष (दि.20 जुलै 2020)- अंतराळ संशोधकांना मंगळ ग्रहाचे कायमच आकर्षण राहिले आहे. मंगळवार काय असेल? मंगळ कसा असेल? या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मानव अंतराळ संशोधनातील प्रगतीसोबत सातत्याने करत आला आहे.

मंगळावरची पहिली यशस्वी मोहिम ठरली व्हायकींग वन ! अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने ही मोहिम 70 च्या दशकात आखली. या मोहिमेत दोन यान पाठविण्यात आले होते. यातील व्हायकींग वन याने मंगळवार यशस्वी लँडींग केले. दुसरे होते व्हायकींग टू यान. व्हायकींग वन हे मंगळावर यशस्वी सॉफ्ट लँडींग करणारे दुसरे यान होते.

त्याआधी रशियाच्या मार्स थ्री या यानाने 2 डिसेंबर 1971 रोजी मंगळवार सॉफ्ट लँडींग केले होते. पण अवघ्या साडेचौदा सेकंदात संपर्क तुटल्याने ती मोहिम अपयशी ठरली. त्यामुळे यशस्वी मोहिमेचा पहिला मान व्हायकींगकडे आला.

Deshdoot
www.deshdoot.com