Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

पंतप्रधान मोदी यांच्या पुतणीची पर्स लांबविणाऱ्या दोघांना अटक

Share

दिल्ली : वेगवान शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्ये चोरीच्या घटना वारंवार होत असतात. परंतु यावेळी चोरटयांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची पर्स चोरण्याचं धाडस दाखवल्याची घटना घडली आहे.

दरम्यान मोदींची पुतणी म्हणजेच दमयंती बेन मोदी या शनिवारी सकाळी रिक्षातून उतरत असताना दोन बाइकस्वारांनी त्यांच्या हातातली पर्स चोरून पळ काढला. यामध्ये पूर्ण ५६ हजार, मोबाईल आणि आवश्यक कागदपत्रे होती. यानंतर लगेचच दमयंती यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली. यावर तातडीने तपास करत आज रोजी (दि.१३) पोलिसांनी संबंधित भुरट्या चोरांना अटक केली आहे. यापैकी एकाचे नाव नोनु असल्याचे समजत आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून सर्व सामान जप्त केले आहे.

दमयंती या मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत, त्या शनिवारी अमृतसरहून केवळ सहा तासांसाठी दिल्ली येथे आल्या होत्या. दिल्ली मधील गुजराती समाज भवन येथे जात असताना त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास करण्यास सुरुवात केली, यातच काही पुरावे शोधून पोलिसांनी आज आरोपींना अटक केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!