पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटल्यानेच शाळांमध्ये लघुपट दाखविण्याची सक्ती

'राष्ट्रवादी'चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

0
मुंबई दि. १२ प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटू लागल्यामुळेच शाळांमध्ये लघुपट दाखवण्याचा फतवा काढल्याचा आरोप आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

मोदींचा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा आदेश शाळांना सरकारने काढला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला असल्याची माहिती मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शाळांमध्ये मोदी यांचा लघुपट दाखवण्याचे आदेश दिले आहेत.

हे चुकीचे असून, सरकारी शाळांच्या साहित्यांचा गैरवापर करुन भाजप यातून आपला प्रचार करणार आहेत. मुलांना लघुपट दाखवणे आणि तेसुध्दा जबरदस्तीने दाखवणे म्हणजे कुठे ना कुठे मोदींची लोकप्रियता देशात कमी होत आहे असेही मलिक म्हणाले.

भाजप प्रचारासाठी शाळांचा वापर करत आहे, हे योग्य नाही. शिक्षकांनी आणि शाळा चालवणाऱ्या संस्थांनी सरकारच्या या मनमानी आदेशाला आणि त्यांच्या दबावाला बळी न पडता अशा बेकायदेशीर आदेशांना विरोध करावा असे आवाहन मलिक यांनी केले आहे.

मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर

LEAVE A REPLY

*