Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

मोदींची 13 रोजी पहिली सभा जळगावात

Share

जळगाव । महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगावात होणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जळगावात दिली.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या संपूर्ण राज्यभर सुरू आहे. आज दि. 7 रोजी माघार झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरांची समजूत घातली जात असून, सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्वच बंडखोर आपले नामांकन मागे घेतील. जे उमेदवार नामांकन मागे घेणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे. एकनाथराव खडसे किंवा विनोद तावडे यांचेच तिकीट कापले नाही,

तर राज्यातील 22 आमदारांना तिकीट दिलेले नाही. त्यांच्यावर पक्ष दुसरी जबाबदारी देणार आहे. एकनाथराव खडसे यांना राज्यपालपद देण्याबाबत रामदास आठवले यांनी नाशकात सांगितले. त्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर महाजन म्हणाले, यासंदर्भात मला काहीच माहिती नाही. तो विषय आठवले यांनाच माहीत. तितकी माझी उंची नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी प्र्रचार सभेसाठी जळगावात येणार आहेत. त्यांच्या सभेची तयारी सुरु झाली असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!