पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळ्यातील नियोजित सभेसाठी केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा पदाधिकार्‍यांनी केली पाहणी

0
धुळे । सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनासाठी व मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.16 फेब्रुवारी रोजी धुळ्यात येत असून त्यांच्या नियोजित सभेसाठी जागेची पाहणी केंद्रीस संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व पदाधिकारी तसेच पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी केली.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या अथक परिश्रमातून मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी मिळून आणली आहे.

रेल्वेमार्गचे भूमीपूजन तसेच सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 16 फेब्रूवारी रोजी येत असून त्यांची जाहिर सभा देखील धुळ्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी सभा होत असल्याने सभेसाठी लाखोंची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भव्य मैदानाची निवड करावी लागणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुपअग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, डीवायएसपी विवेक पानसरे, नगरसेवक युवराज पाटील, ओम खंडेलवाल, भिकन वराडे आदींनी शहरातील दसेरा मैदान जवळील गो-शाळा, राम पॅलेस समोरील खुले मैदान आणि सुरत बायपासवरील हिरे मेडीकल कॉलेज समोरील जागेची पाहणी केली. या तीनपैकी एका स्थळ लवकरच निश्चित करण्यात येवून सुरक्षतेचे पुढील उपाय केले जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*