मोदी सरकार @ 3

0

देशभरात 20 दिवस जल्लोष; मोदी लिहिणार दोन कोटी पत्र

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. आज भाजप पक्षाकडून देशभरात जल्लोष करण्यात येत आहे.

16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवली आणि पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाले.

गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा राज्यात सत्ता स्थापन केली. तर बिहार, पश्चिम बंगाल, दिल्लीत अपेक्षीत यश मिळविले, दरम्यान महाराष्ट्रात महानगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या, त्यात देखील भाजपाला चांगले यश मिळाले आणि हे यश नरेंद्र मोदी लाटेमुळे मिळाले असे मानले जाते.

भाजप 26 मेपासून 15 जूनपर्यंत मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी फेस्टिव्हल साजरा होणार आहे. देशातील 900 शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. हा उत्सव 20 दिवस सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी सामान्य नागरिकांसाठी दोन कोटी पत्र लिहिणार आहेत.

15 दिवसांत 10 कोटी एसएमएस केले जातील.  500 शहरांमध्ये सबका साथ, सबका विकासफ कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.

पंतप्रधान मोदी देशाच्या पाच शहरांचा दौरा करतील, ज्याची सुरुवात गुवाहाटीपासून होईल. यानंतर मोदी बंगळुरु, पुणे, कोलकाता, जयपूर आणि कोटापैरी या चार शहरात जातील. न्यू इंडिया अभियान 25 मेपासून सुरु झाले ढआहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत.

: नोटबंदी :

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात 500 व 1000 रुपयांच्या नोटाना बंदी लागू केली. मात्र, त्यांनंतर विरोधक व नागरिकांकडून विरोध वाढत गेला. पैशांची चणचण भासू लागली. एटीएम बंद पडली. नोटा उपलब्ध झाल्या नाहीत. मात्र, तरी देखील मोदींनी सर्व मंत्र्यांना विश्‍वासात घेत नोटाबंदीवर कायम राहिले. त्यामुळे देशातील काळे धन बाहेर येण्यास मदत झाली. निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती व त्यावर चारही बाजूंनी होत असलेली तीव्र टीका लक्षात घेत या मुद्द्यावर केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले.
पेट्रोलपंप, सरकारी शाळा व महाविद्यालयांतील शुल्क, रेल्वेतिकिटे, सरकारी रुग्णालयांतील उपचार यांसह इतर काही ठिकाणी 15 डिसेंबपर्यंत पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यास मुभा देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थखात्याने जाहीर केला होता. मात्र, ही मुभा हजार रुपयांच्या जुन्या नोटांसाठी नसेल, तसेच पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठीच्या प्रक्रियेला पूर्णविराम देण्यात येत आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशनात देखील नोटाबंदीवरून चांगलेच वादंग झाले होते. पंतप्रधानांनी मात्र, अधिवेशनात उपस्थितती लावली ती उशिरा. मात्र, त्यांनी आपल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करत निर्णयावर ठाम राहिले.
दरम्यान बँकांकडील निधीची स्थिती भक्कम दिसत असली तरी पैसे काढण्यावरील र्निबध हटल्यानंतर चित्र वेगळे दिसले. या सगळ्या प्रक्रियेतून बँकांची जोखीम वाढेल, असा इशारा एस अँड पी या जागतिक पतमापन संस्थेने दिला होता. राष्ट्रीय, तसेच राज्य महामार्गावरील टोलमाफी देण्यात आली होती. तसेच 500 रुपयांपर्यंतच्या प्रीपेड रकमेसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभा सरकारने दिली होती. मात्र, दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांनी देशभर नोटाबंदी विरोधात रान उठविले होते.

: सर्जिकल स्ट्राईक :

उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन तब्बल 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. पण हेच सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन आठ दिवसांपूर्वीच ठरले होते, असे सर्जिकल स्ट्राईक नंतर सांगण्यात आले. उरी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. पाकला भारतानं योग्य धडा शिकवावा अशीच देशवासीयांची मागणी होती. आणि याच वेळी सुरु झालं होतं ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू. अशा स्पष्ट शब्दांत महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानला बजावलं होतं.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई असते. सोप्या भाषेत शत्रूची ठिकाण पाहून, तिथे घुसून मारणं होय.
दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला. जवानांनी आधी हेलिकॉप्टरने अतिरेक्यांच्या तळाकडे कूच केली. मग हेलिकॉप्टरमधून उतरून, जवानांनी चालत जाऊन अतिरेकी तळांना घेरलं आणि हल्लाबोल केला आणि 7 तळं उद्ध्वस्त करून गुपचूप परतले.

 : नीती आयोग : 

नीती आयोग (नॅशनल इुंस्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर अरविंद पंगारीया हे उपाध्यक्ष आहेत. 01 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली.

: स्वच्छ भारत अभियान : 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन केले. मोदींनी सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर एक कदम, स्वच्छता की ओर या घोषवाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील, असा आशय व्यक्त करण्यात आला. महात्मा गांधी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते. पण, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले.

: डिजिटल इंडिया :

डिजिटल इंडिया मोहीम ही भारत सरकारने सुरू केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकाला इलेक्ट्रॉनिकरीत्या उपलब्ध करून देणे असा आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतरजालाची जोडणीपण सुधरविण्यात येत आहे. देशाच्या तांत्रिकक्षेत्रास डिजिटलरीत्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे. ही मोहीम 2 जुलै 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे विमोचित करण्यात आली. या योजनेद्वारे, ग्रामीण भारतात उच्च गतीच्या आंतरजालास उपलब्ध करून देणे असाही एक उद्देश आहे. या योजनेत डिजिटल आधारभूत संरचना तयार करणे, डिजिटलरीत्या सेवा वितरण, डिजिटल साक्षरता या तीन घटकांचा समावेश आहे.

: विविध योजना : 

अंत्योदय, बेटी बचाओ, बेटी पढाओ सुकन्या समृद्धी, सुवर्ण चतुष्कोन, सर्वांसाठी घरे (शहरी)/(ग्रामीण), जीवन प्रमाण, मिशन इंद्रधनुष, जीवन ज्योती, कृषी सिंचाई सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना, आदर्श ग्राम योजना ग्रामज्योती, मृदा आरोग्य कार्ड, उज्ज्वला आदी.

LEAVE A REPLY

*