Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

मराठवाड्यात मोदींची नवी घोषणा; २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पाणी देणार

Share

परळी | वृत्तसंस्था

गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपसरकारने पाण्याच्या दुष्काळावर मोठे काम केले आहे. २०२२ पर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये घराघरात पाणी पोहचविण्यासाठी खर्च होणार असून हा संकल्प मानून यापुढे भाजपा मार्गक्रमण करेल; अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित परळी येथील सभेत संबोधित करत होते.

ते म्हणाले, वैद्यनाथाच्या भूमीत आणि माझे मित्र गोपीनाथराव मुंडे व प्रमोद महाजन यांच्या कर्मभूमीत आल्यानंतर मला स्वतःला विशेष आनंद झाला आहे. आज मला माझ्या दोन देवांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आज मी पहिल्यांदा वैजनाथाचे दर्शन घेत या पावनभूमीतील जनतेचे एकत्र आशीर्वाद घेतले आहेत. मराठवाडा ही संतांची भूमी आहे; हा जनसागर पाहून विरोधी पक्षातील नेत्यांचे काय होत असेल हे सांगण्याची गरज नाही.

२१ तारखेला सुट्टी नव्हे तर लोकशाहीचा उत्सव साजरा करा.  कलम ३७०ची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल: दुष्काळ हे मराठवाड्यातील सर्वात मोठं संकट; दुष्काळ निवारणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एका वेळी दोन देवांच्या दर्शनाचं भाग्य लागत; पहिलं दर्शन वैजनाथ आणि आता तुम्ही जनताजनार्दन.

कलम 370 ची खिल्ली उडवणाऱया – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला घरी बसवा. थकलेले आणि मनाने हरलेले लोक तुमचं काही भलं करू शकतील का? असा प्रश्न विचारत मोदींनी विरोधी पक्षांना टोला लगावला.

निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे. येत्या सोमवारी हा उत्सव उत्साहाने साजरा करा, असे सांगत पंनप्रधानांनी महिलांनी जास्त प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे असे ही सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!