Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

जी ७ शिखर संमेलनात भारत विशेष अतिथी; काश्मीर मुद्द्यावरील मोदी ट्रम्प यांच्या चर्चेकडे लक्ष

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

जी 7 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पहिल्यांदाच समोरासमोर चर्चा होणार आहे.

आज सायंकाळी पावणेचारच्या सुमारास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. ट्रम्प आणि मोदी यांच्या काश्मीर मुद्द्यावर चर्चा होणार आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार बैठक सायंकाळी पावणेचारच्या सुमारास सुरु होईल. भारताला  जी-7 बैठकीत विशेष अतिथी म्हणून बोलविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मोदी या बैठकीत वातावरणीय बदल आणि डिजिटल मुद्द्यांवर लक्ष वेधण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी जी ७ बैठकीच्या आधीच काश्मीर मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्वाचे लक्ष मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीकडे आहे.

याआधी ट्रम्प यांनी २२ जुलैला पाकिस्तानच्या प्रधानमंत्री इम्रान खान यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याबाबत मोदी यांनी सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. दरम्यान, त्यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संसदेत ट्रम्प यांचा दावा कोटा असल्याचे मांडले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!