Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशLIVE : ३ मे पर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन कायम; पंतप्रधान नरेंद्र मोदी

LIVE : ३ मे पर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन कायम; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या शिरकावानंतर गेल्या २१ दिवसांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. आज या लॉकडाऊनचा अखेरचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आहेत.

कोरोनाविरोधातील लढा आपण यशस्वीरित्या लढत आहोत. अनेक संकटांचा सामना करुन देशवासिय या लढ्यात साथ देत आहेत. देशासाठी तुम्ही सर्व कर्तव्य पार पाडत आहेत. देशातील सर्व नागरिकांना माझे नमन म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

- Advertisement -

यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आपली शिस्त ही बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

मोदींनी मास्क बांधून केले संबोधन

कोरोना विरोधात भारताची लढाई मजबुतीने पुढे जात आहे

भारताने आतापर्यंत कोरोनापासून टाळण्यात सफल राहिला आहे

जनतेने कष्ट सहन करून या संकटाला सामोरे गेले

अनेक घर परीवारांपासून दूर आहेत

देशाच्या साठी एक अनुशासित शिपायाच्या भूमिकेत जनता कर्तव्य निभावत आहेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण देशवासीयांच्याकडून जयंती निमित्त अभिवादन करतो

भारत उत्सवांच्या मध्ये सदैव खेळत असतो

इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा सामना भारताने नियोजनबद्ध केला

जेव्हा भारतात कोरोना नव्हता तेव्हाच इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली होती

जेव्हा आपल्याकडे ५५० केसेस होत्या तेव्हा भारताने लॉकडाऊन घोषित केले

आर्थिक दृष्टीने मोठी किंमत चुकवली आहे

मर्यादा असलेल्या संसाधनांच्या सोबत घेऊन आपण कोरोनाचा चांगला प्रतिकार केला

लोकांना येणाऱ्या अडचणी कशा दूर केल्या जातील याकडे लक्ष देण्यात येईल.

जिथे कोरोना नियंत्रणात येईल त्याठिकाणी काही प्रमाणात २० एप्रिल नंतर निर्णय घेण्यात येईल

३ मे पर्यंत संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन कायम राहील

रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी २० एप्रिलपासून काहीप्रमाणात शिथिल करण्यात येईल

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून नागरिकांना मदत केली जाईल

राज्य सरकारांना सहाय्य करण्यात येईल.

भारतात एक लाख बेडची सुविधा करण्यात आली आहे

देशात ६०० रुग्णालये कोरोना उपचार विशेष रुग्णालये तयार करण्यात आली आहेत

मार्यादिन संसाधने असले तरीही आपण चांगले काम करतो आहोत

कोरोना लस बनविण्यासाठी देशाचे तज्ञांनी विडा उचलावा यासाठी आवाहन

सात बातो मे आपका साथ

आपल्या घरातील वायस्करांची विशेष काळजी घ्या,  त्यांना कोरोनापासून वाचवायचे आहे

लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराचे पालन करा

घरी बनवलेल्या मास्कचा वापर करा

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा

कोरोन संक्रमणचा फैलाव कमी करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अप डाऊनलोड करा

गरीब परिवारांची देखभाल करा, त्यांना भोजन द्या

आपण आपल्या व्यवसाय उद्योगात संवेदना ठेवा कुणाला नोकरीवरून काढू नका

डॉक्टर नर्सेस, सफाई कामगारांचे, पोलिसांचा गौरव करा

संपूर्ण निष्ठेने ३ मे पर्यंत लॉकडाऊनचे पालन कर. संपूर्ण राष्ट्राला जिवंत आणि जागृत बनवून ठेवणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या